सर्वांतरीं वास याचा – संत निळोबाराय अभंग – ५३३
सर्वांतरीं वास याचा ।
महदादी अणूचा हदयस्थ ॥१॥
नाहीं दुरी जवळी ऐसा ।
कोंडोनी दिशा भरलासे ॥२॥
एकवीसही ही स्वर्गांपरीं ।
पाताळाभीतरी भूमंडळा ॥३॥
निळा म्हणे सर्वातरीं ।
वसोनी विटेवरी ठाकला ॥४॥
सर्वांतरीं वास याचा ।
महदादी अणूचा हदयस्थ ॥१॥
नाहीं दुरी जवळी ऐसा ।
कोंडोनी दिशा भरलासे ॥२॥
एकवीसही ही स्वर्गांपरीं ।
पाताळाभीतरी भूमंडळा ॥३॥
निळा म्हणे सर्वातरीं ।
वसोनी विटेवरी ठाकला ॥४॥