सकळांचिया नेत्रें तुम्हां – संत निळोबाराय अभंग – ५३२
सकळांचिया नेत्रें तुम्हां सर्वही देखणें ।
सकळांचिया श्रोत्रें तुम्हां सर्वही ऐकणें ॥१॥
ऐसे सर्वज्ञची तुम्हीं सर्वदा देवा ।
जेथिल तेथें ज्याच्या तैशा जाण तसा भावा ॥२॥
सकळांच्याही रसना सर्वही रस सेवितां ।
सकळांच्याही चरणें लंघुनी जातां दिगंता ॥३॥
निळा म्हणे सकळांच्याही जीवाचें जीव ।
होऊनियां अलिप्त शेखी रुप ना नांव ॥४॥