शकटासुर काळयासी । प्रताप ठाउका हा तयासी ॥१॥ बळिसी झाला विदयमान । देतां तीन पांड दान ॥२॥ लवणासुरा अनुभव । कुशा गोमताचळा सर्व ॥३॥ निळा म्हणे चतुरानना । नित्य करितां पुजा ध्याना ॥४॥