शकटासुर काळयासी – संत निळोबाराय अभंग – ५३१
शकटासुर काळयासी ।
प्रताप ठाउका हा तयासी ॥१॥
बळिसी झाला विदयमान ।
देतां तीन पांड दान ॥२॥
लवणासुरा अनुभव ।
कुशा गोमताचळा सर्व ॥३॥
निळा म्हणे चतुरानना ।
नित्य करितां पुजा ध्याना ॥४॥
शकटासुर काळयासी ।
प्रताप ठाउका हा तयासी ॥१॥
बळिसी झाला विदयमान ।
देतां तीन पांड दान ॥२॥
लवणासुरा अनुभव ।
कुशा गोमताचळा सर्व ॥३॥
निळा म्हणे चतुरानना ।
नित्य करितां पुजा ध्याना ॥४॥