वीज पडे गनन गडाडी । रचिली परवडी कशाची ॥१॥ अदभुत प्रकाशाचा लोळ । पडतां अंतराळ दणाणीत ॥२॥ काय हे तुमची कैशा लीला । नेणवे सकळां चोजवितां ॥३॥ निळा म्हणे गर्भी बाळा । वाढवा गोपाळा कैशा परी ॥४॥