रसना एकी रस तों नाना । कैसी विवंचना रचिली हे ॥१॥ नकळे लाघव तुमचें हरी । करितां भरोवरी जाणिवेच्या ॥२॥ काय पिंजूनी मेघपडळ । घडिलें ज्वाळ विजुवाचें ॥३॥ निळा म्हणे तडक भारी । फुटें अंबरीं कासियाचा ॥४॥