रसना एकी रस तों – संत निळोबाराय अभंग – ५२९
रसना एकी रस तों नाना ।
कैसी विवंचना रचिली हे ॥१॥
नकळे लाघव तुमचें हरी ।
करितां भरोवरी जाणिवेच्या ॥२॥
काय पिंजूनी मेघपडळ ।
घडिलें ज्वाळ विजुवाचें ॥३॥
निळा म्हणे तडक भारी ।
फुटें अंबरीं कासियाचा ॥४॥
रसना एकी रस तों नाना ।
कैसी विवंचना रचिली हे ॥१॥
नकळे लाघव तुमचें हरी ।
करितां भरोवरी जाणिवेच्या ॥२॥
काय पिंजूनी मेघपडळ ।
घडिलें ज्वाळ विजुवाचें ॥३॥
निळा म्हणे तडक भारी ।
फुटें अंबरीं कासियाचा ॥४॥