महिमा अदभूतची पाहतां । चरणीं उध्दार झाला पतिता ॥१॥ आहिल्या शिळा झाली शापें । चरणस्पशें ते निष्पाप ॥२॥ उध्दरिले विमळार्जून । अगाध चरणाचें महिमान ॥३॥ निळा म्हणे तारिल्या शिळा । हाही प्रताप आगळा ॥४॥