वस्तुचा जो स्वाभावगुण । वोसंडूं नेणे तो आपणा ॥१॥ तेविं हा परमात्मा श्रीहरी । सांडूं नेणें आपुली थोरी ॥२॥ जेवीं कस्तुरी परिमळ । शीतळपणा मलयानिळ ॥३॥ निळा म्हणे परिसपणा । नेणे सांडूं आपुल्या गुणा ॥४॥