श्रवणीं कुंडलें ढाळ देती । हीरयापगंति दंत तैसे ॥१॥ तुळसि वैजयंती माळा । पदकि कीळा रत्न ज्योति ॥२॥ नेत्र जैसे रातोत्पलें । दिव्य कमळें विकासलीं ॥३॥ निळा म्हणे तत्पदवासी । भक्तरासी भोंवताले ॥४॥