संत निळोबाराय अभंग

श्रवणीं कुंडलें ढाळ – संत निळोबाराय अभंग – ५२३

श्रवणीं कुंडलें ढाळ – संत निळोबाराय अभंग – ५२३


श्रवणीं कुंडलें ढाळ देती ।
हीरयापगंति दंत तैसे ॥१॥
तुळसि वैजयंती माळा ।
पदकि कीळा रत्न ज्योति ॥२॥
नेत्र जैसे रातोत्पलें ।
दिव्य कमळें विकासलीं ॥३॥
निळा म्हणे तत्पदवासी ।
भक्तरासी भोंवताले ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

श्रवणीं कुंडलें ढाळ – संत निळोबाराय अभंग – ५२३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *