दुभिन्नले जया पाय । तया सुखा उणें काय ॥१॥ महिमा जाणें पृथुराजा । किंवा गौतमाची भाजा ॥२॥ ध्यानीं ध्यातां चंद्रमौळी । समाधिस्थ नित्य काळीं ॥३॥ निळा म्हणे सनकादिक । संतहि जाणती सकळिक ॥४॥