बहूत याचक सांभाळिले । जे जे झाले शरणांगत ॥१॥ नाना वर्ण नाना याति । धरिले हातीं नुपक्षूनी ॥२॥ केलें वरिष्ठ सकळालागीं । मिरविले निजांगी आपुलिये ॥३॥ निळा म्हणे उबग नेणें । करिता देणे कृपेचें ॥४॥