बहूत याचक सांभाळिले – संत निळोबाराय अभंग – ५२१
बहूत याचक सांभाळिले ।
जे जे झाले शरणांगत ॥१॥
नाना वर्ण नाना याति ।
धरिले हातीं नुपक्षूनी ॥२॥
केलें वरिष्ठ सकळालागीं ।
मिरविले निजांगी आपुलिये ॥३॥
निळा म्हणे उबग नेणें ।
करिता देणे कृपेचें ॥४॥
बहूत याचक सांभाळिले ।
जे जे झाले शरणांगत ॥१॥
नाना वर्ण नाना याति ।
धरिले हातीं नुपक्षूनी ॥२॥
केलें वरिष्ठ सकळालागीं ।
मिरविले निजांगी आपुलिये ॥३॥
निळा म्हणे उबग नेणें ।
करिता देणे कृपेचें ॥४॥