लखलखिलें सुतेज माझिया – संत निळोबाराय अभंग – ५२०
लखलखिलें सुतेज माझिया नयनापुढें ।
चतुर्भुज रुपडें मेघश्याम ॥१॥
तेणेंचि वेधिलें हदईचि राहिलें ।
मागें पुढें ठेले वेष्ठुनियां ॥२॥
हदयाची भीतरीं पाहतां बाहेरी ।
तेंचि चराचरीं दिसे माये ॥३॥
निळा म्हणे तेणें हरिला देहभाव ।
सांगता हा नवलाव वाटे येरा ॥४॥