हरीविण आहे कोण – संत निळोबाराय अभंग – ५१९
हरीविण आहे कोण ।
सान मोठें वेगळें ॥१॥
सर्वांचाही सर्व साक्षी ।
अध्यक्षी हें नाम त्या ॥२॥
कर्मा ऐसें देतां फळ ।
सत्ता केवळ हे ज्याची ॥३॥
निळा म्हणे वीटे उभा ।
परि हा नभा व्यापक ॥४॥
हरीविण आहे कोण ।
सान मोठें वेगळें ॥१॥
सर्वांचाही सर्व साक्षी ।
अध्यक्षी हें नाम त्या ॥२॥
कर्मा ऐसें देतां फळ ।
सत्ता केवळ हे ज्याची ॥३॥
निळा म्हणे वीटे उभा ।
परि हा नभा व्यापक ॥४॥