संत निळोबाराय अभंग

सर्वज्ञ सर्वदा तुम्ही – संत निळोबाराय अभंग – ५१८

सर्वज्ञ सर्वदा तुम्ही – संत निळोबाराय अभंग – ५१८


सर्वज्ञ सर्वदा तुम्ही सर्वसाक्षी ।
म्हणऊनि कैपक्षी हरिभक्तांचे ॥१॥
खरें खोटें कळे तुम्हां वरीवरीं ।
संकल्प अंतरीं उठितांचि ॥२॥
जया तैसें फळ नेमुनी ठेवितां ।
जोडूनियां देतां काळा हातीं ॥३॥
कर्मा ऐसें फळ भोगवितां सकळ ।
करुनियां काळ पुढें सत्ता ॥४॥
निळा म्हणे माझें जैसें आचरण ।
तैसें करा दान कृपानिधी ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सर्वज्ञ सर्वदा तुम्ही – संत निळोबाराय अभंग – ५१८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *