भक्तआवडीऐसें रुप । धरीं हा बाप मदनाचा ॥१॥ नेदी पडों अंतर कोठें । पाहिजे नेटें त्याचि ऐसा ॥२॥ एकापुढें कटीकर । श्यामसुंदर विटेवरी ॥३॥ निळा म्हणे नरसिंहरुपें । प्रगटे प्रतापें शुष्ककाष्ठीं ॥४॥