बहुतां येणें नागविलें – संत निळोबाराय अभंग – ५१३

बहुतां येणें नागविलें – संत निळोबाराय अभंग – ५१३

बहुतां येणें नागविलें ।
हरुनी सर्वस्वही नेलें ॥१॥
करुं जातां याची गाठी ।
जिवीं जिवा घाली मिंठी ॥२॥
पाहिलाचि पुरे ।
उरों नेदी त्या दुसरें ॥३॥
निळा म्हणे चेटकी ऐसा ।
स्वाभाव त्याचा सांडिल कैसा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बहुतां येणें नागविलें – संत निळोबाराय अभंग – ५१३