नारायणा तुमच्या चरणीं । भक्ति मुक्तिचिया खाणी ॥१॥ मोक्ष सर्वदा तिष्ठत । चरणीं जोडोनियां हस्तक ॥२॥ ऋध्दि सिध्दि वोळंगती । चरणीं तुमच्या श्रीपति ॥३॥ निळा म्हणे अवलोकितां । पाउलें सुकुमार सायुज्यता ॥४॥