देव नसतां भक्तांचीं – संत निळोबाराय अभंग – ५०६

देव नसतां भक्तांचीं – संत निळोबाराय अभंग – ५०६

देव नसतां भक्तांचीं विघ्नें ।
कोण जन्ममरणें निवारितें ॥१॥
कोणासी म्हणते धांवा धांवा ।
करितां कुडावा कोण दुजा ॥२॥
कोण नेता वैकुंठासी ।
आपुले विश्रांतीसी निज घरा ॥३॥
निळा म्हणे देवावीण ।
संसारबंधन न तुटतें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देव नसतां भक्तांचीं – संत निळोबाराय अभंग – ५०६