दिनबंधू आत्मयारामा । सुखविश्रामा विश्वजनका ॥१॥ परात्परा पुरुषोत्त्मा । आगमानिगमा जगवंदया ॥२॥ निर्विकल्पा निरंजना । सुखनिधाना गुणमूर्ती ॥३॥ अगा ये निळयाच्या दातार । रुक्मिणीवरा श्रीविठठला ॥४॥