संत निळोबाराय अभंग

तुमच्या कृपामृतजळीं – संत निळोबाराय अभंग – ५०३

तुमच्या कृपामृतजळीं – संत निळोबाराय अभंग – ५०३


तुमच्या कृपामृतजळीं ।
माझी वचनवल्ली अंकुरली ।
मती विस्तारें फांकली ।
फळ संभारीं हरिनामें ॥१॥
नवल कृपामृतधन ।
वरुषला तुमचें हें वरदान ।
माझी वाचा आणि मन ।
केलीं पावन कीर्तनें ॥२॥
एकट एकलोचि श्रीपती ।
पुरोनि उरलेति त्रिजगतीं ।
अपूर्व चरित्रें अपूर्व ख्याती ।
संत गर्जती स्वानंदें ॥३॥
शुक सनकादिक नारद ।
व्यास वाल्मीक आणि प्रल्हाद ।
साही शास्त्रें चारी वेद ।
पुराणें पवाडे वर्णिती ॥४॥
परि तुम्ही नकळा त्यांचिये मती ।
अपार म्हणोनियां गुणसंपत्ती ।
जेथिंचे तेथेंचि भक्त स्तविती ।
अपार म्हणती विस्तारला ॥५॥
सगुण गोकुळीं गौळियां घरीं ।
निर्गुण योगियां हदयमंदिरीं ।
ढिसाळ ब्रम्हांडाबाहेरी ।
महर्षी देव स्तविताती ॥६॥
शिव आपुलिये हदयभुवनीं ।
नित्य निमग्न तुमचे ध्यानी ।
भोळया भाविकां लागुनी ।
आवडी ऐसें रुप धरी ॥७॥
कामिनीभावें कांतातुर ।
मदनमूर्ति मनोहर ।
वैरसंबंधी कंसचाणेर ।
तयां तैसाचि ते ठायीं ॥८॥
गोवळांमाजी गाईपाठीं ।
वानरांमाजीं मेळवुनी थाटी ।
रावणनि:पातनीं परम हटीं ।
आतुबर्ळी कळिकाळा ॥९॥
नित्य नूतन तुमचे गुण ।
चरित्रें गाती वैष्णव जन ।
निळा झाला सुखसंपन्न ।
चरणीं मन ठेवितां ॥१०॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुमच्या कृपामृतजळीं – संत निळोबाराय अभंग – ५०३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *