तारुनियां प्रचंड शिळा । उतरला पाळा मर्कटांचा ॥१॥ करुनि सिंधु पायवाट वधिले थाट राक्षसांचे ॥२॥ गोवळवेषें कौंसादिकां । लाविल्या शिका मर्दियेले ॥३॥ निळा म्हणे ब्रम्हचारी । भोगोनियां नारी सोळा सहस्त्र ॥४॥