जेणें मंथुनि क्षीरार्णव । काढिलीं अपूर्व दिव्य रत्नें ॥१॥ त्याचा महिमा वर्णूं कैसा । भरोनी आकाशा कोंदला तो ॥२॥ जेणें धरुनियां दांतीं । आणिली वसुमती समुद्रांतूनि ॥३॥ निळा म्हणे जेणें भानु । ठेविला उटुनु न मेळेसा ॥४॥