तंव त्या रिठीयासी निघालीं वदनें – संत निळोबाराय अभंग ५०
तंव त्या रिठीयासी निघालीं वदनें ।
अति विक्राळ दाढां दशनें ।
श्रीकृष्ण्ा कंठीचे रुधिरपान ।
करावया उदितें ॥१॥
कृत्रिमें जाणेनियां ते श्रीहरी ।
कवळूनि धरिलीं दोहीं करी ।
आणि घालूनियां मुखाभीतरीं ।
चावुनी धरणिये टाकिलीं ॥२॥
त्याचें स्विष्टकृत केलियावरी ।
आक्रोशें पाळणियांत रुदन करी ।
तें ऐकानि यशोदा सुंदरी ।
धंवली झाडकरी काय झालें ॥३॥
तंव देखे शोणिताचे पूर ।
मांस मदाचे संभार ।
मग म्हणे गे मरमर ।
बाळ मासर्पे खादलें ॥४॥
धांविल्या नरनारी बाळ ।
घात केला म्हणती सकळ ।
ऐसी कैशी गे तू वेल्हाळ ।
यशोदे मारविलें बाळका ॥५॥
वाहाती शोणिताचे पुर ।
इतुकें कैंचे गे त्या रुधिर ।
काढूनियां पहा गे सत्वर ।
आहे प्राण कीं गेलास ॥६॥
निळा म्हणे जाउनी जवळी ।
काढूनि आणिला जों वनमाळी ।
तंव हास्यवदन नित्य काळीं नाही कोमाइला ना दचकला ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
तंव त्या रिठीयासी निघालीं वदनें – संत निळोबाराय अभंग ५०