संत निळोबाराय अभंग

घन:श्याम मूर्ति राजीवलोचन – संत निळोबाराय अभंग – ४९८

घन:श्याम मूर्ति राजीवलोचन – संत निळोबाराय अभंग – ४९८

घन:श्याम मूर्ति राजीवलोचन ।
सांठवलें त्रिभुवन उदरामाजी ॥१॥
कौस्तुभ पदकें तुळसीमाळा कंठी ।
कास हे गोमटी पीतांबरें ॥२॥
लेईला अलंकार भूषणें परवडी ।
दिव्य रत्नें चोखडी ।
खवणें तयां ॥३॥
निळा म्हणे माझें निवालें तनुमन ।
देखतांचि सुप्रसन्न वदन याचें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

घन:श्याम मूर्ति राजीवलोचन – संत निळोबाराय अभंग – ४९८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *