गोड नाम तुमचें देवा । गोड सेवा तुमची ते ॥१॥ गोड तुमची कीर्ति वाणी । गोड श्रवणीं ऐकतां ॥२॥ गोड तुमचे रुप दृष्टी । गोड पोटीं प्रेम तें ॥३॥ गोड निळा तुमचें पायीं । गोड डोयी ठेवितां ॥४॥