संत निळोबाराय अभंग

गोड नाम तुमचें देवा – संत निळोबाराय अभंग – ४९५

गोड नाम तुमचें देवा – संत निळोबाराय अभंग – ४९५


गोड नाम तुमचें देवा ।
गोड सेवा तुमची ते ॥१॥
गोड तुमची कीर्ति वाणी ।
गोड श्रवणीं ऐकतां ॥२॥
गोड तुमचे रुप दृष्टी ।
गोड पोटीं प्रेम तें ॥३॥
गोड निळा तुमचें पायीं ।
गोड डोयी ठेवितां ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गोड नाम तुमचें देवा – संत निळोबाराय अभंग – ४९५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *