संत निळोबाराय अभंग

खग मृग राक्षस – संत निळोबाराय अभंग – ४९४

खग मृग राक्षस – संत निळोबाराय अभंग – ४९४


खग मृग राक्षस वानर ।
दैत्य दानव निशाचर ।
सिध्दचारण विदयाधर ।
नागविखार कीटकादि ॥१॥
चतुष्पदें जळचरें मनुष्ययाति ।
दासी वेश्या भिल्ल्णिी किती ।
कोळी अंत्यज अधम जाती ।
उध्दरिले श्रीपति सत्संगें ॥२॥
न विचारितां कुळयाति ।
धर्माधर्म त्यांची रीति ।
शरण येतांचि ते निश्चिति ।
निजधामाप्रति पाठविलीं ॥३॥
न म्हणोनि नरनारी बाळकें ।
उत्तम अधम कनिष्ठ लोकें ।
नामेचि पाचारितां मुखें ।
नेलें ते निजसुखें वैकुंठा ॥४॥
निळा म्हणे ब्रीदें चरणीं ।
वागवी म्हणवी भक्तांचा ऋणी ।
ऐसी आख्या जे वेदीं पुराणीं ।
तेचि रहाटी चालवी ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

खग मृग राक्षस – संत निळोबाराय अभंग – ४९४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *