कैसी वानूं त्याची थोरी । ज्याची चराचरीं जीवनकळा ॥१॥ अदिकरुनि ब्रम्हादिक । शेवटील कीटक धरुनियां ॥२॥ चंद्र सूर्य तारांगणा । दीप्ति हुताशना ज्याचेनी ॥३॥ निळा म्हणे महिमा ज्याचा । वर्णितां वाचा वेद मुके ॥४॥