कैसेनि आकळतें मन ।
देवावीण भक्तांचें ॥१॥
कामक्रोधलोभा शांती ।
कैसेनि होती मग त्याची ॥२॥
काळदंड चुकविता ।
कोण होता देवावीण ॥३॥
निळा म्हणे मोकळा भक्ता ।
करुनि ठेविती कोण पदीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.