कासियाचीं बिजें घडलीं । लावणी केली वृक्ष तृणा ॥१॥ नेणवें महिमा तुमचा देवा । देवा मानवा दानवासी ॥२॥ काय मर्दुनी घातले बहळ । नाना परिमळ पुष्पयाति ॥३॥ निळा म्हणे नानापरींचे । घोस तरुंचे फळें पर्णे ॥४॥