कांहीचि सदैव दुबळे । न म्हणे हा बाळें नारीनर ॥१॥ जया परी तैसा होय । बापमाय सकळांचा ॥२॥ शरणागताचिया नांवे । पशुहि उध्दरावे पक्षिया ॥३॥ निळा म्हणे जीव जीवा । वंदय हा देवा मानवांसी ॥४॥