अंतरींचा जाणें भेद । प्रगटीं आनंद त्या तैसा ॥१॥ देव माझा चतुर एैसा । जैशा तैसा क्षणमात्रें ॥२॥ भाविकांचे आंगींचि लाळे । शहाण्या नावडे अभाविका ॥३॥ निळा म्हणे जाणे परी । सर्वांतरीं साक्षी हा ॥४॥