ऐसा आपीं आपरुप । करुनि त्रैलोक्या साटोप ॥१॥ नाहीं वेंचला उणा झाला । जैसा तैसाचि संचला ॥२॥ दाऊनियां चराचर । लपवी अंगी न मानी भार ॥३॥ निळा म्हणे नट लाघवी । नेदी कळों ठेवाठेवी ॥४॥