एका पासूनियां हरी । घाली आणिका पदरीं ॥१॥ ऐसे खेळ याचे निके । खेळे आलके सेलकें ॥२॥ रडवी हांसवी एका । दाऊनि लपवी पाडी चुका ॥३॥ निळा म्हणे खेळा । नाहीं रुप याच्या ताळा ॥४॥