एक एकाहुनी आगळे – संत निळोबाराय अभंग – ४८२

एक एकाहुनी आगळे – संत निळोबाराय अभंग – ४८२

एक एकाहुनी आगळे ।
ओंविले संत कंठमाळे ॥१॥
तेणें विराजलेती हरि ।
प्रभा फांकली दिगांतवरी ॥२॥
संत चरित्रें सुंदरे ।
परिधान केलीं दिव्यांबरें ॥३॥
संतनामें निळा म्हणे ।
मुगुट कुंडलें करकंकणें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एक एकाहुनी आगळे – संत निळोबाराय अभंग – ४८२