उगाचि नसे क्षणही – संत निळोबाराय अभंग – ४८०

उगाचि नसे क्षणही – संत निळोबाराय अभंग – ४८०

उगाचि नसे क्षणही भरी ।
व्यभिचारी हरि चित्ताचा ॥१॥
मनचि गोंवी चरणापाशीं ।
अवघेचि यासी मग मुक्त ॥२॥
घरींचे घरीं जीवीचें जीवीं ।
उघडि हा ठेवी जुगादीच्या ॥३॥
निळा म्हणे धरिली खोडी ।
मुळींची न सोडी कल्पवरि ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उगाचि नसे क्षणही – संत निळोबाराय अभंग – ४८०