आणिखिही याचीं उदंड – संत निळोबाराय अभंग – ४७७
आणिखिही याचीं उदंड वर्मे ।
बोलतांचि ते नाशी आमुचीं कर्मे ॥१॥
म्हणोनियां याचें भयचि वाटे ।
बोलों जाय तंव बोलणेंचि कुंठे ॥२॥
वेदहि ना बोलेचि भेउनी याला ।
देखोनि यातें मग मौन्येचि ठेला ॥३॥
काळहि कांपे याचिया धाकें ।
त्यासिहि गिळूनि आपणचि ठाके ॥४॥
ना बोलती योगी याचिया भेणें ।
ध्यानीचि बैसले वसवूनि रानें ॥५॥
संतहि याची न करित गोठी ।
धरुनि राहिले उगलेचि पोटीं ॥६॥
अणुमात्र याची बोलतांचि कर्मे ।
मरणासीचि मारुनी हरितो जन्में ॥७॥
धीटपणें निळा बोलिला कांहीं ।
बोलतांचि लाविला आपुला वाही ॥८॥