अयोध्येसी जन्मले राम । पुरुषोत्तम मथुरेसी ॥१॥ आनंद झाला दशरथाघरीं । गोकुळामाझारी तैसाचि ॥२॥ ऋषीयज्ञ सिध्दी नेला । कृष्णें आणिेला गुरुपुत्र ॥३॥ निळा म्हणे वरिली सीता । येणें दुहिता भीमकाची ॥४॥