अयोध्येसी जन्मले राम – संत निळोबाराय अभंग – ४७६
अयोध्येसी जन्मले राम ।
पुरुषोत्तम मथुरेसी ॥१॥
आनंद झाला दशरथाघरीं ।
गोकुळामाझारी तैसाचि ॥२॥
ऋषीयज्ञ सिध्दी नेला ।
कृष्णें आणिेला गुरुपुत्र ॥३॥
निळा म्हणे वरिली सीता ।
येणें दुहिता भीमकाची ॥४॥
अयोध्येसी जन्मले राम ।
पुरुषोत्तम मथुरेसी ॥१॥
आनंद झाला दशरथाघरीं ।
गोकुळामाझारी तैसाचि ॥२॥
ऋषीयज्ञ सिध्दी नेला ।
कृष्णें आणिेला गुरुपुत्र ॥३॥
निळा म्हणे वरिली सीता ।
येणें दुहिता भीमकाची ॥४॥