अहो देवा तिमिरनाशा । बुध्दीप्रकाशा विठठला ॥१॥ अनुग्रह तुमचा झाला जया । निरसरला माया तम त्याचा ॥२॥ असोनियां ते घरींदारीं । मुक्तचि संसारीं संगातीत ॥३॥ निळा म्हणे नित्यनंदे । भोगिती ते पदें वैकुंठींची ॥४॥