वर्णितां महिमा तो अगाध । जेथें सिध्द अवतरले ॥१॥ पशुमुखें वदवूनि श्रुती । निर्जीव भिंती चालविली ॥२॥ सन्मुख पुढें अजानवृक्ष । पिंपळ प्रत्यक्ष सोन्याचा ॥३॥ निळा म्हणे ऐकोनी कीर्ती । चांगदेव येती दर्शना ॥४॥