वर्णितां महिमा तो अगाध – संत निळोबाराय अभंग – ४७१
वर्णितां महिमा तो अगाध ।
जेथें सिध्द अवतरले ॥१॥
पशुमुखें वदवूनि श्रुती ।
निर्जीव भिंती चालविली ॥२॥
सन्मुख पुढें अजानवृक्ष ।
पिंपळ प्रत्यक्ष सोन्याचा ॥३॥
निळा म्हणे ऐकोनी कीर्ती ।
चांगदेव येती दर्शना ॥४॥