यात्रे अलंकापुरा येती – संत निळोबाराय अभंग – ४७०

यात्रे अलंकापुरा येती – संत निळोबाराय अभंग – ४७०

यात्रे अलंकापुरा येती ।
ते ते आवडती विठठला ॥१॥
पांडुरंगे प्रसन्नपणें ।
केलें देणें हे ज्ञाना ॥२॥
भूवैकुंठ पंढरपूर ।
त्याहुनी थोर महिमा या ॥३॥
निळा म्हणे जाणोनी संत ।
येती धांवत प्रतिवर्षी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

यात्रे अलंकापुरा येती – संत निळोबाराय अभंग – ४७०