संत निळोबाराय अभंग

ऐकोनी गजबजिली दैत्यसभा – संत निळोबाराय अभंग ४७

ऐकोनी गजबजिली दैत्यसभा – संत निळोबाराय अभंग ४७


ऐकोनी गजबजिली दैत्यसभा ।
धाकेंचि कंसही ठाकला उभा ।
तंव बीभत्सा माळभळभटाची शोभा ।
देखते झाले सकळही ॥१॥
नागवा उघडा आणि बोडका ।
जीवत्वपांगे बुडाली शंका ।
भोंवते देखताही विषयलोकां ।
म्हणे धांवा धांवा सोडवा ॥२॥
पाटेचि पुरविली माझी पाटी ।
लक्षनुलक्ष आले कोटी ।
उठा उठा पळारे शेवटी ।
मारिले जाल व्यथेंची ॥३॥
दैत्य पाहाती चहूंकडे ।
शस्त्रपाणी वेधले हुडे ।
दुर्गा सांभाळिती चहूंकडे ।
म्हणती न दिसे विघ्न डोळियां ॥४॥
राजा म्हणे झांका त्यांसी ।
पुसा काय ते वार्तेसी ।
मग नसऊनियां वस्त्रासी ।
आणिला सभेवी पुसती ॥५॥
तो म्हणे राया बळिया बाळ ।
उपजला तो आमुचा काळ ।
विचित्र पाहतां त्याचा खेळ ।
लाविलीं पिढींची मज पाठीं ॥६॥
निळा म्हणे रुपाकृती ।
सुंदरपणाची ओतली मूर्ती ।
कोटी मदनाची अंगी दीप्ती ।
न ढळती पातीं अवलोकितां ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐकोनी गजबजिली दैत्यसभा – संत निळोबाराय अभंग ४७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *