पंढरपुरीं ज्ञानेश्वरीं – संत निळोबाराय अभंग – ४६९
पंढरपुरीं ज्ञानेश्वरीं ।
मुक्ति कामारी वोळंगती ॥१॥
तेथें देव येथें भक्त ।
महिमा अदभुत दोहींचा ॥२॥
तेथें ध्यान येथें ज्ञान ।
परलोक साधन दो ठायीं ॥३॥
निळा म्हणे तेथें गुरुड ।
येथे झाड अजानतरु ॥४॥