एक भूवैकुंठ एक शिवपीठ – संत निळोबाराय अभंग – ४६८

एक भूवैकुंठ एक शिवपीठ – संत निळोबाराय अभंग – ४६८

एक भूवैकुंठ एक शिवपीठ ।
महिमा वरिष्ठ दोहींचा ॥१॥
तेथें पेरिलें नुगवे शेतीं ।
अस्थी विरती तेथें उदकीं ॥२॥
चंद्रभागा चक्रतीर्थ ।
भीमा समर्थ इंद्रायणी ॥३॥
निळा म्हणे तेथें हनुमंत ।
येथें अश्वत्थ कनकाचा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एक भूवैकुंठ एक शिवपीठ – संत निळोबाराय अभंग – ४६८