टाळ विणे मृदेंगेसी । येती गजरेंसी मिरवत ॥१॥ छबिने पताका गरुडटके । घेउनी हरिखें अवलोकिती ॥२॥ म्हणती जन्म सुफळ झाला । आजीं देखिला परत्पर ॥३॥ निळा म्हणे विठ्ठल हरी । लेवूनी अंतरीं सुखावती ॥४॥